अटकपूर्व जामीन नाकारल्यावर पी. चिदंबरम बेपत्ता!

INX मीडिया प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज CBI ची टीम पोहोचली. तेव्हा चिदंबरम बेपत्ता असल्याचं दिसून आलं.

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आलाय. त्यानंतर सुप्रिम कोर्टात स्पेशल लिव्ह पेटिशन दाखल केली. मात्र त्यावर निर्णय देण्यास न्यायमूर्तींनी नकार दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोरच दाद मागावी, असं चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांना सांगण्यात आलं. तोपर्यंत तरी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती चिदंबरम यांच्यातर्फे करण्यात आली होती. मात्र तीही नाकारली गेली.

सरन्यायाधीश कधी या प्रकरणावर निर्णय देतील हे स्पष्ट नसल्यामुळे चिदम्बरम यांना अटक होण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच मंगळवारपासूनच चिदंबरम बेपत्ता आहेत.

त्यांच्याविरोधा लूकआऊट नोटिस बजावण्यात आली आहे.

 

काँग्रेसची प्रतिक्रिया-

भाजप सूडभावनेने ही कारवाई करत असल्याचं प्रियंका गांधी-वाड्रा यांनी म्हटलं आहे. चिदंबरम हे राज्यसभेचे खासदार असून अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे.केंद्रीय अर्थमंत्री , गृहमंत्री यांसारखी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलेली असून अनेक वर्षांपासून ते देशाची सेवा करत आहेत. मोदी सरकारला वेळोवेळी त्यांनी जाब विचारल्यानेच त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येतेय, असं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर मात्र चिदंबरम यांच्या बेपत्ता होण्यावरून नेटिझन्स ट्रोल करू लागले आहेत. ‘#ChidambaramMissing’ हा हॅशटॅगही आता ट्रेण्डिंगमध्ये आहे.

Exit mobile version