Thu. Sep 29th, 2022

जागतिक जीडीपी 3.5%; जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण – सीतारमन

जगभरात तसेच देशातही आर्थिक मंदीचं वातावरण असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. मंदीचं वातावरण या मुद्यावर भाष्य करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जागतिक जीडीपी 3.5% असून जीडीपी घसरला असल्याची माहिती सीतारमन यांनी दिली आहे. तसेच चीन- अमेरिका व्यापार युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे सीतारमन यांनी सांगितले.

काय म्हणाल्या निर्मला सीतारमन ?

सध्या आर्थिक मंदीचे वातावरण असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर जागतिक जीडीपी घसरला असल्याचे सीतारमन यांनी स्पष्ट केले आहे.

प्रमुख देशांमध्ये भारताची अर्थवयवस्था सुदृढ असल्याचा दावा सीतारमन यांनी म्हटलं आहे.

जागतिक जीडीपी 3.5 %ने घसरली असल्याचे सीतारमन म्हणाल्या.

कर पद्धतीत मोठ्या सुधारणा केल्याचा दावा सीतारमन यांनी केला.

आयटी रिटर्न , जीएसटी भरण्याच्या प्रक्रिया सोप्या केल्या आहेत.

कंपनी कायद्याअंतर्गत १४ हजार गुन्हे मागे घेण्यात आले असल्याचे सीतारमन यांनी सांगितले.

कंपनीच्या विलीनकरणाची प्रक्रिया सोपी केली आहे.

सीएसआर गैरव्यवहार हा फौजदारी गुन्हा नसल्याचे सीतारमन यांनी स्पष्ट केले आहे.

गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावर व्याज जर कमी करणार.

रेपो रेट सामान्य कर्जाचा व्याज दर जोडणार.

त्यामुळे कर्जाचे हफ्ते कमी होण्यास मदत होणार.

कर्ज पूर्ण भरल्यावर १५ दिवसात बँकाना कागदपत्रे द्यावी लागणार असे सीतारमन यांनी सांगितले.

सार्वजनिक बँकांमध्ये  ७० हजार कोटी तातडीनं गुंतवणार.

बीएस-४ वाहन निर्मीतीमुळे विक्रीत घट.

रजीस्ट्रेशन असेपर्यंत बीएस ४ वाहन रोडवर चालणार असल्याचे सीतारमन म्हणाल्या आहेत.

सरकारी खात्यांना नव्या कार खरेदी करण्यास मंजूरी दिली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.