Sun. Oct 24th, 2021

श्रीलंकेत न जाण्याचा भारतीयांना सल्ला

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टरच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट झाले. ईस्टरच्या दिवशी 3 चर्च आणि 3 हॉटेलमध्ये एकापाठोपाठ हे बॉम्बस्फोट झाल्याने श्रीलंकेची राजधानी कोलंबो हादरली.या बॉम्बस्फोटात 300 जण ठार झाले असून 500 हून अधिक जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये 35 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. यातचं .कोलंबोतील एका चर्च जवळील बॉम्ब निकामी करत असताना हा स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कोलंबोच्या मुख्य बस स्थानकावर ८७ डेटोनेटर्स सापडल्याने श्रीलंकेत खळबळ माजली आहे.श्रीलंकेतील पेट्टा परिसरातील सेंट्रल कोलंबो स्टेशनवर मोठ्या संख्यने डेटोनेटर्स सापडले आहेत.पुन्हा श्रीलंकेत स्फोट झाला असून त्यात 15 लोक ठार झाले आहेत. त्यामुळे भारताने आपल्या नागरिकांना श्रीलंकेत न जाण्याचा सल्ला दिला आहे.

श्रीलंकेत पुन्हा  स्फोट

श्रीलंकेत २१ एप्रिल रोजी 8 स्फोट झाले होते. त्यात ३०० लोक ठार झाले तर 500 जखमी झाले होते.

त्यानंतर पुन्हा श्रीलंकेत स्फोट झाला असून त्यात 15 लोक ठार झाले आहेत.

त्यामुळे श्रीलंकेत अद्यापही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं नाही.

अजूनही श्रीलंकेत अतिरेक्यांचा शोध घेत असून येथील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे भारताने आपल्या नागरिकांना श्रीलंकेत न जाण्याचा सल्ला दिला आहे.

श्रीलंकेत जाणं अत्यंत महत्त्वाचंच असेल तर भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधून त्यांची मदत घ्या,

असं भारत सरकारने जारी केलेल्या जाहिरातीत म्हटलं आहे.

भारत सरकारने श्रीलंकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना मदतीसाठी हेल्पलाइन नंबर दिले आहेत.

दरम्यान, अतिरेकी अजूनही श्रीलंकेतील हॉटेल, पर्यटन स्थळ, शिक्षण संस्था, विमानतळ, शॉपिंग मॉल,

गर्दीची ठिकाणं, मार्केट, सरकारी कार्यालये, क्लब, रेस्टॉरन्ट, प्रार्थना स्थळं, पार्क, सांस्कृतिक कार्यक्रम,

आणि रुग्णालयात हल्ला करू शकतात, असा इशारा अमेरिकेने आधीच दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *