Sun. May 16th, 2021

कुलभूषण जाधव प्रकरणी १८ फेब्रुवारीपासून सुनावणी होणार

हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानामध्ये कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात १८ फेब्रुवारीपासुन सुरु होणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी  आम्ही वचनबद्ध असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

या सुनावणीसाठी पाकिस्तानचं शिष्टमंडळ हेग इथे रवाना झाले  आहे.

पाकिस्तानचे महाधिवक्ता अन्वर मन्सूर हे हेगला रवाना झाले असून त्यांच्या समवेत दक्षिण आशिया विभागाचे महासंचालक महंमद फैजल यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणी 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सुनावणी होणार आहे.

भारताचे वकील हरीश साळवे हे १८ तारखेला पहिला युक्तिवाद करतील, नंतर पाकिस्तानला संधी दिली

पाकिस्तानच्यावतीने खावर कुरेशी हे 19 फेब्रुवारीला युक्तिवाद करतील. यावर भारत 20 फेब्रुवारीला उत्तर देईल.

त्यानंतर पाकिस्तान 21 फेब्रुवारीला  आपले अंतिम म्हणणे मांडेल.

कोण आहेत कुलभूषण जाधव ?

कुलभूषण जाधव (वय ४८ ) भारतीय नौदलात कमांडर होते.

भारतीय गुप्तचर खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जाधव 2003 पासून पाकिस्तानात काम करत होते.

एप्रिल 2017 मध्ये त्यांच्यावर  भारतीय हेरगिरीचा आरोप लावण्यात आला होता.

यामुळे  पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांना  फाशीची शिक्षा सुनावली.

यावर आक्षेप घेत भारताने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दहा सदस्यांनी 18 मे 2017 रोजी जाधव यांची फाशीची शिक्षा न्यायकक्षा निश्चित होईपर्यंत स्थगित केली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणी 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *