Sun. Jun 20th, 2021

‘येथील’ मिसळीने कोल्हापूरी आणि पुणेरी मिसळीला टाकलं मागे, ठरली अव्वल मिसळ

मिसळ म्हटलं की आपल्याला कोल्हापूर किंवा पुण्याची आठवण नक्कीच येते. यामागचे कारण म्हणजे त्या मिसळीला असलेली चव.

मात्र आता उत्कृष्ट मिसळ बनवण्यात नाशिकने बाजी मारली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाच्या अहवालानुसार नाशिकची मिसळ ही अव्वल असल्याचे सांगितले आहे.

कोल्हापूर आणि पुण्याची झणझणीत मिसळ ही जगभरात सर्वत्र प्रसिद्ध मानली जाते. त्यात आता नाशिकच्या मिसळीची वर्णी लागली आहे.

त्यामुळे नाशिकला आता धार्मिक क्षेत्राबरोबरच उत्तम मिसळ असणारे ठिकाण अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे.

नाशिकची मिसळ अव्वल ठरल्याने नाशिकमधील मिसळ विक्रेत्यांना आनंद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *