Sat. Oct 1st, 2022

प्रभाग पुनर्रचनेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायलयाने फेटाळली

मुंबई महापालिकेतील प्रभाग पुनर्रचनेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने भाजप नेते नितेश राजहंस सिंह आणि मनसेचे सागर देवेरे या दोन्ही याचिकाकर्त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

प्रभाग पुनर्रचनेबाबत अधिसूचना काढण्याचा अधिकार मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना नसल्याचा दावा नितेश सिंह आणि सागर देवरे यांनी याचिकेद्वारे केला. सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात निष्पक्ष काम करू शकत नाहीत, असा याचिकाकर्त्यांनी आरोप केला होता.

मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, त्यामुळे प्रत्येक निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागते, ते अधिकारी निवडणूक कायद्याप्रमाणे निवडणूक आयोगासाठी काम करत असतात, असा युक्तिवाद आयोगाने केला. त्यामुळे भाजपचे नेते नितेश राजहंस सिंह आणि मनसेचे सागर देवरे यांनी प्रभाग फेररचना अवैध असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.