Fri. Jun 21st, 2019

‘दिल्लीचेही तख़्त’ राखणारा शनिवार वाडा झाला 287 वर्षांचा!

305Shares

पुण्याची मुख्य ओळख आणि पेशवेकालीन असलेल्या शनिवारवाडा आज 287 वर्षाचा झालाय… आज शनिवारवाड्याचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला… नगारावादन… रांगोळीचे सडे आणि फुलांची आरास करण्यात आली होती… सकाळपासूनच पुणेकर आणि पर्यटकांनी शनिवाड्याजवळ गर्दी केलीये…मुख्य आकर्षण असलेला दिल्ली दरवाजा आज उघडण्यात आलाय…

कसा उभारला शनिवारवाडा?

शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झालं.

22 जानेवारी 1732 रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली होती.

1732 नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले.

बुरुजाच्या दरवाजाचं काम होण्यास 1760 हे वर्ष उजाडले.

1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी इथे सापडतात.

इंग्रजाचा Union Jack फडकल्यावर…

17 नोव्हेंबर 1817 ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले.

त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता.

त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती.

1828 मध्ये वाड्यास मोठी आग लागली.

आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या.

पुढे तब्बल 90 वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला आणि वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत 1923 पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली होती.

हिंदूच्या स्थानांमध्ये मानली जाणारी एक महत्वाची वास्तू  म्हणजे शनिवार वाडा… शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यच्या साम्राज्याच्या पराक्रमाची इथून सुरुवात झाली. थोरले बाजीराव पेशवे यांनी या वाड्याची स्थापना केली. या शनिवारवाड्यातून अनेक गोष्टी घडल्या. दिल्लीची सत्ता एकेकाळी या शनिवार वाड्यातून चालत असे. एकदाही पराभव न पत्करलेल्या बाजीराव पेशव्यांचे इथे खूप काळ वास्तव्य होतं.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला हा शनिवारवाडा नेहमीच इतिहासाचा साक्षीदार ठरलाय. देश विदेशातून पर्यटक  या वाड्याला आवर्जून भेट देतात. शनिवारवाड्याचा महत्वाचा आणि मुख्य दरवाजा असलेला दिल्ली दरवाजा देखील आज उघडण्यात आलाय त्यामुळे पर्यटकांसाठी मोठी पर्वणी आहे. यासाठी आज गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.

305Shares

Leave a Reply

%d bloggers like this: