नामांकित कंपनीच्या पदार्थामध्ये आढळली बुरशी

बाजारातून आणलेल्या पदार्थांमध्ये काही पदार्थ खराब निघतात. तसेच नामांकित कंपनीच्या पदार्थांमध्ये अनेक वेळा अळ्या, बुरशी आल्याचे दिसते. यावर ग्राहक त्वरीत तक्रार देखील करतो. मात्र याकडे दुलर्क्ष केले जाते.
अशा घटनांमधून सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे चित्र पहायला मिळते. दरम्यान अशीच एक टिटवाळामधील घटना समोर आली आहे. एका नामांकित दुध कंपनीच्या पिशवीमध्ये बुरशी आल्याचे आढळून आले.
नेमकं प्रकरण काय ?
टिटवाळा येथील जागरुक नागरिक प्रफुल्ल शेवाळे यांनी टिटवाळा येथील पटेल स्टोर मार्ट मधून सुप्रसिद्ध अमूल कंपनीचे ताक विकत आणले. त्यानंतर ते फ्रिजरमध्ये ठेवले.
बर्फ झाल्यानंतर त्यांनी हे ताकाचे पॅकेट पिण्यासाठी फोडले असता, त्या पाकिटाच्या आतल्या बाजूला बुरशी सारखे पदार्थ आढळून आले. अमूल कंपनीसारख्या विश्वसनीय कंपनीच्या पदार्थामध्ये मध्ये बुरशी आढळून आल्याने शेवाळे यांना धक्काच बसला.
त्यांनी याबाबत अन्न आणि औषध प्रशासन तसेच अमूल कंपनीला आपली तक्रार नोंदवली आहे. तसेच हा निव्वळ ग्राहकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. आता याप्रकरणी पुढे कारवाई व्हावी अशी शेवाळे यांची मागणी आहे.