Jaimaharashtra news

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र, तिसरी लाट येणार असल्याचा इशारा निती आयोगाने दिला आहे. सोमवारपासून देशात २५ हजार ४६७ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून ३५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३९ हजार ४८६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सध्या देशात कोरोनाचे बाधितांची संख्या एकूण ३,२४,७४,७७३ आहे आतापर्यंत ३,१७,२०,११२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच सध्या देशात ३,१९,५५१ सक्रीय रुग्ण असून आतापर्यंत ४,३५,११० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारपासून ६३ ,८५ ,२९८ नागरिकांचे लसीकरण झाले असून आतापर्यंत लस घेणाऱ्यांची संख्या ५८ ,८९ ,९७ ,८०५ वर पोहोचली आहे.

देशातील सध्याची कोरोनास्थिती :

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी २४ लाख ७४ हजार ७७३
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी १७ लाख २० हजार ११२
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख १९ हजार ५५१
एकूण मृत्यू : चार लाख ३५ हजार ११०
एकूण लसीकरण : ५८ कोटी ८९ लाख ९७ हजार ८०५ लसीचे डोस
देशातील १.६ कोटी वेळेत लोकांना कोरोनाचा दुसरा डोस नाही

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ५८.८२ कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यामधील पहिला डोस घेतलेल्या किमान १.६ कोटी लोकांना १६ आठवड्यांच्या आत दुसरा डोस मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. उरलेल्या नागरिकांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या जास्त आहे.

Exit mobile version