Sun. Jun 20th, 2021

#PulwamaTerrorAttack : ‘या’ घटनेनंतर आदिल बनला आत्मघातकी हल्लेखोर…

जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामुळे सारा देश व्यथित झालाय. 40 हून अधिक सैनिक या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. 1999 च्या इंडियन एअरलाइन्स विमान अपहरणाच्या बदल्यात सोडण्यात आलेला अज़हर मसूदच या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. मात्र हा आत्मघातकी हल्ला करायला काश्मिरी तरूण आदिल तयार कसा झाला, याचा खुलासा त्याच्या वडिलांनीच केला आहे.

3 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

दहशतवादी आदिल याचे वडील गुलाम हसन दार यांनी या भीषण घटनेमागची पार्श्वभूमी सांगितली.

तीन वर्षांपूर्वी आदिल शाळेमध्ये शिकत होता.

एके दिवशी मित्राबरोबर तो शाळेतून घरी येत होता.

त्यावेळी सुरक्षाबलाच्या सैनिकांनी दोघांना अडवून त्यांची चौकशी सुरू केली.

सैनिकांच्या ताफ्यावर दगडफेक करणाऱ्या मुलांमध्ये आदिल आणि त्याच्या मित्राचाही समावेश असावा, अशी त्यांना शंका होती

चौकशी करताना दोघांनाही सैनिकांकडू जबर मारहाण झाल्याचा दावा आदिलच्या वडिलांनी केलाय.

या मारहाणीमुळे आदिल दुखावला गेला.

तेव्हापासूनच त्याच्या मनात भारतीय सैन्याबद्दल राग खदखदत होता.

त्याने आपलं शिक्षण सोडून दिलं.

तो मोलमजुरी करत असे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात तो भाऊ समीर दारसह मित्रांना भेटायला जातो असे सांगून बेपत्ता झाला.

त्यानंतर तो घरी परतलाच नाही.

त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

वर्षभराने जेव्हा आदिल घरच्यांना सापडला, तेव्हा तो दहशतवादी बनला होता.

दहशतवादाचा मार्ग सोडून परत ये, असं आवाहन त्याला त्याच्या आई वडिलांनी केलं.

मात्र तो माघारी फिरला नाही.

आदिल हा एवढा कट्टर दहशतवादी बनेल असे वाटले नव्हते.

हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला असून, मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

संबंधित बातमी-  #PulwamaTerrorAttack : ‘या’ दहशतवाद्यामुळे 44 जवान शहीद

त्याच्या काही नातेवाईकांच्या सांगण्यानुसार,

2016 मध्ये दहशतवादी बुऱ्हाण वानीच्या मृत्यूनंतर भारतीय सैन्यावर आदिल दगडफेक करत होता.

तेव्हा त्याला सैनिकांनी मारलेल्या पेलेट गनची गोळी त्याच्या पायात लागली होती.

त्यानंतर तो स्वतः दहशतवादाकडे वळला.

आदिलच्या या कृत्याबाबत प्रतिक्रिया देताना त्याचा नातेवाईक अब्दुल रशिद म्हणाला की, ”कुठल्याही व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यावर कुणाला आनंद होईल.

संबंधित बातमी- #PulwamaTerrorAttack : भारतीय लष्करावर सर्वांत मोठा हल्ला

सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

संबंधित बातम्या-

#PulwamaTerrorAttack : भारताचा पाकला दणका

#PulwamaTerrorAttack : हल्ल्याचा बदला व्याजासकट घेणार – पंतप्रधान मोदी

#PulwamaTerrorAttack: अमेरिकेसह रशियाचाही भारताला पाठिंबा

#PulwamaTerrorAttack : शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार – सीआरपीएफ

#PulwamaTerrorAttack: जवान तुझे सलाम

#PulwamaTerrorAttack : गृहमंत्र्यांनी दिला शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा

#PulwamaTerrorAttack : शहिदांच्या कुटुंबियांना या राज्यांकडून मदत

#PulwamaTerrorAttack : …आणि तो फोन शेवटचा ठरला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *