आयपीएल सामना २६ मार्च रोजी होणार सुरू

इंडियन प्रीमिअर लीगसाठी सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक असून अवघ्या तीन दिवसांनंतर म्हणजेच २६ मार्चपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यांची तिकीट विक्री सुरू झाली असून आयपीएलसाठी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे.
येत्या २६ मार्चपासून आयपीएल क्रिकेट सामना सुरू होणार असून २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात पहिला सामना रंगणार आहे. तर या सामन्यांसाठी तिकिटविक्री सुरू झाली आहे. यंदाच्या आयपीएल क्रिके स्पर्धेमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता १० संघांमध्ये आयपीएल चषकासाठी चुरस पाहण्यास मिळणार आहे. आयपीएमध्ये यंदा एकूण ७० सामने खेळले जाणार आहेत. मुंबई आणि पुण्यातील मैदानांवर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारकडून २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.