Thu. Sep 29th, 2022

चांद्रयान-2 चा आत्ता पर्यंतचा प्रवास कसा होता?

The Indian Space Research Organisation's (ISRO) Chandrayaan-2 (Moon Chariot 2), with on board the Geosynchronous Satellite Launch Vehicle (GSLV-mark III-M1), launches at the Satish Dhawan Space Centre in Sriharikota, an island off the coast of southern Andhra Pradesh state, on July 22, 2019. - India launched a bid to become a leading space power on July 22, sending up a rocket to put a craft on the surface of the Moon in what it called a "historic day" for the nation. (Photo by ARUN SANKAR / AFP) (Photo credit should read ARUN SANKAR/AFP/Getty Images)

मिशन चांद्रयान ची सुरुवात नोव्हेंबर 2007 ला झाली, भारताची संस्था ईस्त्रो आणि रशीयाचा रॉसकॉसमॉस यांच्यात करार..

ततकालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चांद्रयान-2 ला परवानगी दिली होती.

ऑगस्ट 2009 ला इसरो आणि रॉसकॉसमॉस ने मिळुण चांद्रयान-2 चे डिझाईन तयार करण्यात आले आणि 2013 ला लाँचिंग करण्याचे ठरले.

2013 ते 2016 रशियाच्या रॉसकॉसमॉस लँडर बनवण्यात दिरंगाई केल्याने मिशन लांबले गेले, शेवटी रॉसकॉसमॉसने असमर्थता दाखवल्याने भारताने स्वत: लँडर बनवण्याचा निर्णय घेतला.

भारताने लँडरला डॉ.विक्रम साराभाई यांचे नाव दिले.

29 जुन 2019 ला वेग वेगळ्या टप्यात लाँचिंग च्या व्हेइकल GSLV-3 च्या बॅटरी तसेच ईतर भागांचे असेंब्ली तयार करण्यात आली.

15 जुलै 2019 ला लाँचिंगची तारीख निश्चित करण्यात आली.

2 ते 4 जुलै सर्व भागांची तपासणी पूर्ण करण्यात आली.

7 जुलै ला लाँचिंग ची रंगीत तालीम घेण्यात आली, GSLV मार्क 3 ला लाँचिंग पॅड पर्यंत नेण्यात आले.

15 जुलैला कुलिंग सिस्टम मध्ये तांत्रिक बिघाडामुळे निश्चित उड्डाण रद्द करण्यात आले.

18 जुलैला सर्व तांत्रिक बाबी पुर्ण करुन 22 जुलै तारीख निश्चित करण्यात आली.

22 जुलैला दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून GSLV मार्क 3 रॉकेटने अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले.

22 जुलैला प्रक्षेपणानंतर 17 मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचले.

24 जुलैला दुपारी 2 वाजून 52 मिनिटांनी यानाने यशस्वी कक्षा बदलली.

26 जुलैला दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी दुसरी कक्षा बदलून पृथ्वीपासून 54 हजार 829 किलोमीटरवर स्थिर केलं.

29 जुलैला दुपारी 3.12 ला चांद्रयान दुसऱ्या टप्प्यात कक्षा बदलली.

2 ऑगस्ट ला दुपारी 3.27 ला चौथ्यांदा कक्षा बदलली.

4 ऑगस्टला इस्रोने चांद्रयानाने काढलेले पृथ्वीचे फोटो रीलीज केले, चांद्रयानातील लँडर मध्ये लावलेल्या एलआई-4 कॅमेराने फोटो काढले होते.

6 ऑगस्ट ला इस्रो ने ट्विट करुन यानाने पाचव्यांदा यशस्वी कक्षा बदलल्याचे कळवले.

14 ऑगस्ट रात्री 2.21 ला यानाने पृथ्वीची कक्षा सोडून लूनर ट्रांसफर ट्रजेक्टरी सिस्टम मध्ये प्रवेश केला आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला.

या प्रक्रियेला ट्रांस-लूनर इंसर्शन म्हटलं जातं.

या सर्व प्रक्रियेदरम्यान यान 23 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिले.

21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.35 ला चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला.

22 ऑगस्ट ला चांद्रयान-2 ने काढलेल्या चंद्राचे फोटो ईस्त्रो ने ट्विट केले.

26 ऑगस्ट ला चांद्रयान-2 ने दुसऱ्यांदा काढलेले चंद्राचे फोटो पाठवले.

यावेळी टॅरेन मॅपिंग कॅमेरा-2 ने फोटो घेतले होते. या फोटोत चंद्रावर असलेले क्रेटर्स (खड्डे) दाखवण्यात आले, सोबत चंद्राच्या उत्तर ध्रुवावरचे काही फोटो पाठवण्यात आले.

28 ऑगस्टला यानाने चंद्राची तिसऱ्यांदा कक्षा बदलली, या वेळी यान चंद्रापासून 179 किमी दूर होते..

30 ऑगस्टला संध्याकाळी 6.18 यानाने चंद्राची चौथ्यांदा कक्षा बदलली.

1 सप्टेंबर ला संध्याकाळी 6.21 ला पाचव्यांदा शेवटची कक्षा यशस्वी बदलली..

2 सप्टेंबर ला दुपारी 1.15 ला चांद्रयानाच्या ऑर्बिटरपासून लँडर विक्रम यशस्वीपणे वेगळं झालंं

7 सप्टेंबर ला पुढच्या दोन दिवस चंद्रावर उतरण्या आधी लँडर कक्षेला चकरा मारत हळूहळू जवळ येत चंद्रापासून 36 किलोमीटर अंतरावर चकरा मारल्या, तसेच ऑर्बिटर येत्या वर्षभर चंद्राच्या कक्षेत चकरा मारणार..

3 सप्टेंबरला सकाळी 8.50 ला चांद्रयान 2 चंद्राच्या खालच्या कक्षेत यशस्वी काम केले, या साठी यान 3 सेकंद पूर्ण थांबवून उलट्या दिशेने चालवुन बघितलं. पुन्हा सुरु करुन कक्षेत पुढे सरसावले..

4 सप्टेंबर ला रात्री 3.42 ला लँडर ने शेवटची कक्षा बदलून कक्षेत बदल करण्यात आला आणि यशस्वीपणे खालच्या कक्षेत उतरवण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.