JNU मधील त्या हल्ल्यामागे ‘पिंकी चौधरी’

रविवार 5 जानेवारी रोजी JNU मध्ये बुरखाधारी गुंडांनी घुसून JNUSU अध्यक्षा आयेशी घोष आणि इतर विद्यार्थी तसेच प्राध्यापकांवर हल्ला झाला होता. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. या हल्ल्यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि हल्लेखोरांना शिक्षा, अशी मागणीही जोर धरत आहे. डाव्या संघटना आणि ABVP वर आरोप होत असताना अशातच हिंदू रक्षा दलाने JNU हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हिंदू रक्षा दलाने स्वीकारली JNU हल्ल्याची जबाबदारी

हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करत पिंकी चौधरी नावाच्या व्यक्तीने JNU हिंसाचाराची जबाबदारी घेतली आहे.

भूपेंद्र तोमर उर्फ पिंकी चौधरी हा दिल्लीच्या शालीमार गार्डन परिसरात राहतो.

सोमवारी 6 जानेवारी रोजी रात्री सोशल मीडियावर पिंकी चौधरींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

यामध्ये तो म्हणाला, “जो कोणी देशविरोधी काम करतील त्यांना JNU च्या विद्यार्थ्य़ांप्रमाणे परिणाम भोगावे लागतील. रविवारी रात्री जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आमच्या धर्माविरोधात इतकं चुकीचं बोलणं बरोबर नाही. अनेक वर्षांपासून JNU कम्युनिस्ट दलांचा अड्डा बनलेला आहे.”

या व्हिडिओनंतर पोलीस पुढे काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Exit mobile version