Mon. Mar 30th, 2020

बेळगावात 110 मीटर उंच स्तंभावर फडकावला तिरंगा

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव

बेळगावात सर्वात उंच स्तंभावरील तिरंगा फडकावण्यात आला आहे. हा तिरंगा तब्बल ११० मीटर उंच स्तंभावर फडकावण्यात आला आहे.

तर १२० फूट लांब असून आणि ८० फूट रुंदीचा आहे. बेळगावच्या किल्ला तलावाच्या परिसरात हा ध्वज फडकवण्यात आलाय. विषेश म्हणजे भारतातील सर्वात उंच स्तंभावरील तिरंगा असल्याचा या ध्वजाचा विक्रम आहे.

हा ध्वज ऐतिहासिक असेल त्यामुळे तो पोलीस्टर पासून बनवण्यात आला आहे. त्यामुळे हवामानाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होऊ शकणार नाही.

हा ध्वज कायम फडकत राहणार असून त्यासाठी गृह मंत्रालयाचीही परवानगी घेण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *