Fri. Oct 7th, 2022

केके यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं

मुंबईतल्या वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केकेच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार झाले.  केकेला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधले दिग्गज उपस्थित राहीले ‘तडप-तडप के इस दिल से’, ‘पल याद आयेंगे वो पल’ आणि ‘आँखों में तेरी’ यांसारखी अनेक सुपरहिट रोमँटिक गाणी गाणारे बॉलिवूड गायक केके यांचे कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कृष्णकुमार कुन्नथ असे त्यांचे पूर्ण नाव असून ते अवघे ५३ वर्षांचे होते. केके यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती आणि त्यांची दोन मुले असा परिवार आहे. केके यांच्या निधनाच्या दिवशी काय घडले आणि ते देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

काय घडलं ‘त्या’ रात्री?

केके यांचा कोलकातामधील गुरुदास महाविद्यालयात संगीत कार्यक्रम

‘उत्कर्ष २०२२’ असं कार्यक्रमाचं नावं

त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान केके यांना अस्वस्थ वाटू लागले.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता हा शो सुरू झाला.

कार्यक्रमानंतर ते त्यांच्या हॉटेलमध्ये परतले.

जिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

रात्री १०.३० च्या सुमारास त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले.

तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

केकेची तब्येत बिघडण्याच्या शक्यता पाहुयात 

कार्यक्रम स्थळी एसी बंद

कार्यक्रमात अपेक्षापेक्षा जास्त गर्दी

गर्दीमुळे केकेचा श्वास कोंडला

प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे केके घामाघूम

तक्रार करूनही एसी नादुरुस्तच

केके त्यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद अशी करण्यात आली आहे. केके यांच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.