Sun. Jun 16th, 2019

ज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास?

0Shares

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहगड विजयावर आधारित ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तानाजी मालुसरे या पराक्रमी मावळ्याने गाजवलेल्या शौर्याची गाथा या सिनेमातून उलगडणार आहे. मात्र या सिनेमाचं नावच आता बदलण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.

बॉलिवूडमध्ये बनवण्यात येणाऱ्या अनेक ऐतिहासिक सिनेमांमध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली इतिहासातील सत्य आपल्या सोयीने बदलल्याचा आरोप होत असतो. मात्र अशावेळी शिवरायांच्या इतिहासावर आधारित तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्याच्या लढाईबद्दल चाहत्यांना उत्कंठा आहे. मात्र नवीन मिळालेल्या माहितीनुसार तानाजी चित्रपटाचं नाव बदलून ‘तानाजी’ऐवजी ‘तान्हाजी’ करण्यात येत आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण या सिनेमात तानाजी मालुसरे यांची मुख्य भूमिका साकारत आहे. मात्र या सिनेमाचं नाव बदलून तान्हाजी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाचं नाव ज्योतिषाच्या सल्ल्यावरून हे नाव बदललं असल्याचं बोललं जात आहे.

22 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर अजय देवगण याने ट्विटरवर शेअर केलं होतं. आपल्या पुत्राचं लग्न सोडून कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी लढलेल्या तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मराठी अभिनेता अजिंक्य देवही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *