Wed. Jan 19th, 2022

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या पार

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तर नागपुरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे. नागपुरमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १ हजार ४६१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नागरपूरमध्ये २४ तासांमध्ये १ हजार ४६१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर एकूण ४९७ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आता नागपुरमधील सक्रिय रुग्णसंख्या आता ५ हजार ५०० वर पोहचली आहे. तर १५० कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात शासकीय आणि खाजगी मिळून जिल्ह्यात ८ हजार ०६६ बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आले आहेत. नागपूरमधील एकूण कोरोना रुग्णांपैकी ९८ टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत  तर २ टक्के रुग्ण कोविड रुग्णालयात दाखल आहेत.

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासात २ लाख ४७ हजार ४१७ नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची सक्रीय रुग्णसंख्या ११ लाख १७ हजार ५३१वर पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *