Mon. May 23rd, 2022

देशातील कोरोनाबाधितांची संख्येत दिवसेंदिवस घट

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. देशात गेल्या २४ तासांत केवळ १३ हजार ५८ नवे रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केल्या २३१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तसेच १९ हजार ४७० रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली असून १६४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ४० लाख ९४ हजार ३७३ झाली असून आतापर्यंत ३ कोटी ३४ लाख ५८ हजार ८०१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत ४ लाख ५२ हजार ४५४ लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

देशात सध्या १ लाख ८३ हजार ११८ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या गेल्या २२७ दिवसांतील सर्वात कमी आहे. देशाचा बरं होण्याचे प्रमाण सध्या ९८.१४ टक्के आहे. तर, आठवड्याभरातील सक्रिय रुग्णांची आकडेवारी १.३६ टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ११६ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे, तर दररोजचा सक्रिय रुग्णांची आकडेवारी १.११ टक्क्यांवर आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ८७,४१,१६० जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ९८ कोटी ६७ लाख ६९ हजार ४११ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.