Thu. Oct 21st, 2021

महाराष्ट्रातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या ६५वर

राज्यातील कोरोनाच्या डेल्टा प्लसचा कहर वाढतानाच पाहायला मिळतोय. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसने चार जणांचा बळी घेतला आहे . महाराष्ट्रात बुधवारी २० नवे डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईत ७, पुणे ३, रायगड, पालघर, नांदेड, गोंदियात प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्णांची संख्या एकूण संख्या ६५ वर पोहोचली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीमधील एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता.

जिल्हानिहाय डेल्टा प्लस रुग्णसंख्या
जळगाव     १३
रत्नागिरी     १२
मुंबई          ११
ठाणे           ६
पुणे            ६
पालघर       ३
रायगड       २
नांदेड         २
गोंदिया       २
अकोला      १
चंद्रपूर        १
सिंधुदुर्ग      १
औरंगाबाद  १
कोल्हापूर    १
नंदुरबार     १
सांगली       १
बीड           १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *