Tue. Jun 28th, 2022

पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो – नरहरी झिरवळ

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पक्षप्रमुखांनीच गटनेता नेमायचा असतो. आणि गटनेत्यांनी मुख्य प्रतोदांची नियुक्ती करायची असते. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे पत्र मी स्वीकारले असल्याचे, नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे.
नहरही झिरवाळ म्हणाले, कायद्यानुसार पक्षप्रमुखांनी पक्षाचा गटनेता नेमायचा असतो. गटनेत्याने प्रतोदांची नेमणूक करायची असते. शिवसेना पक्षप्रमुखांनी अजय चौधरी यांची शिवसेना गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्याबाबत सुनील प्रभूंनी दिलेले सहीचे पत्र मी स्विकारले आहे. मात्र, दोन तृतीअंश आमदारांचा दावा अद्याप माझ्याकडे आला नसल्याचेही झिरवाळ म्हणाले.
माझ्याकडे आलेल्या सह्यांच्या पत्रात घोळ आहे. नितीन देशमुख यांनी सांगितले आहे की माझी सही इंग्रजीत आहे आणि पत्रावरील सही मराठीत आहे. म्हणून त्यांची सही ग्राह्य धरू नये, असे देशमुख म्हणाले. त्यामुळे माझ्याकडे आलेल्या पत्राचा मी सखोल अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे.

अजय चौधरींचा राजकीय प्रवास

अजय चौधरी हे मुंबईतील शिवडी मतदार संघातून विधानसभेत निवडून आले आहेत. तसेच ते शिवसेनेचे वरिष्ठ आणि विश्वासू नेता मानले जातात. शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून अजय चौधरी यांनी वीस वर्ष जबाबदारी सांभाळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.