Wed. Aug 4th, 2021

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी प्रवासी बोट उलटली

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी अजिंठा प्रवासी बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मांडवा जेट्टी पासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असताना बोट उलटी झाली.  

यावेळी या बोटमधून 88 प्रवासी प्रवास करीत होते. यामध्ये प्रवासी पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता.

बोट उलटी झाल्यावर प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झाला. त्याचवेळी रायगड जिल्हा पोलीस दलाची सदगुरू कृपा बोट सागरी गस्तीवर निघाली होती. त्यातील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत घरत हे त्याच्या मदतीला धावून गेले.

पोलिस प्रशांत घरत यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशी यांच्या मदतीने बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरित पोहचून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कलंडलेल्या 88 प्रवाशांचा जीव वाचवला. या सगळ्यांना पोलीस गस्त नौकेच्या साहाय्याने मांडवा जेट्टीवर सुखरूप आणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *