Wed. Jun 29th, 2022

जगातील अनमोल वस्तू या विनामूल्य असतात – केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी आज रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह इतर ६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. केजरीवाल सरकारच्या शपथविधीसाठी मोठ्या प्रमाणावर दिल्लीकर जनतेची उपस्थिती होती.

या शपथविधीसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस संरक्षण ठेवण्याच आलं होतं.

दरम्यान शपथविधीनंतर आपच्या ट्विट अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे.

काय म्हटंलय ट्विटमध्ये ?  

केजरीवाल सर्व काही फुकटात देत आहे, असं काही लोकं म्हणतायेत. जगात ज्या काही अनमोल वस्तू असतात, त्या सर्व मोफतचं असतात.

मग ते आई-वडिलांच आपल्या मुलांप्रती असलेलं प्रेम असो, किंवा श्रावण बाळाने आपल्या आईवडिलांसाठी केलेली निस्वार्थ सेवा असो. मी पण माझ्या दिल्लीकरांवर खर प्रेम करतो. त्यामुळे हे प्रेम देखील मोफत आहे.

दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिट वीज मोफत देण्यात येणार असल्याचं विचार सुरु असल्याचं सांगितलं होतं. परंतु याबद्दल उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी नापंसती व्यक्त केली आहे.

अशा  मोफतच्या योजनांच्या घोषणा टाळायला हव्यात. राज्याची नव्याने आर्थिक बोजा पेलण्याची क्षमता नाही. त्यामुळे मंत्र्यांनी अशा घोषणा देणं टाळालया हवं. लोकांना फुकटात देण्याची सवय लावू नये, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. 

अधिक वाचा : केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.