Thu. Jan 20th, 2022

अहमदनगरमधील अग्नितांडवाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली शोकभावना

  अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला सकळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. अहमदनगरमधील या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अहमदनगरम जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत जीवितहानी झाल्याबद्दल दु:ख झाल आहे. याप्रकरणी पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे. असे ट्विट करत त्यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.

  तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीसुद्धा याप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले की, महाराष्ट्रातील अहमदनगर येथे लागलेल्या आगीत लोकांचे मृत्यू झाल्याची बातमी दुखद आहे. मी त्याप्रती शोक व्यक्त करतो. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या इतरही लवकरात लवकरात बरं होण्याची कामना करतो. असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *