Fri. May 7th, 2021

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्याचा निषेध

पुलवामा दहशतवादी हल्यानतंर पाकिस्तानला कोडींत पकडण्याच्या भारताच्या प्रयत्नाला यश आलं आहे.

दहशतवाद विरोधी लढाईत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला समर्थन आणि पाठिंबा मिळला आहे.

सुरक्षा परिषदेचे भारताला समर्थन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं पुलवामा हल्ला अतिशय भ्याड आणि भयानक असल्याचे म्हटले असून त्यांनी या हल्ल्यांचा कडक शब्दात निषेध नोंदवला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 देशांचा समावेश असून यामध्येही चीनदेखील सामील आहे. चिनने ही भारताला समर्थन दर्शवल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला असल्याचं बोलले जात आहे.

चीनने नेहमीच मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध केला होता.

संयुक्त राष्ट्राकडून प्रेस स्टेटमेंट जारी करण्यात आले.

सुरक्षा परिषदेने  प्रेस स्टेटमेंटमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा आणि या संघटनेचा प्रमुख मसुद अझरचा उल्लेख केला.

या प्रकारच्या हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत  सुरक्षा परिषदेने व्यक्त केले.

यावेळी सुरक्षा परिषदेने दहशतवादी हल्ल्यांतील दोषीवर कारवाई करण्यासाठी भारताला शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांनी यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसहित भारतीय जनता आणि सरकारप्रती सहानुभूती व्यक्त केली.

तर दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं सुरक्षा परिषदेने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *