Tue. Jun 28th, 2022

मनोरुग्णाने केला विद्यार्थिनीवर हल्ला

संगणकाच्या शिकवणी वर्गात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीच्या डोक्यावर मनोरुग्णाने हातोडा मारून तिला जखमी केल्याची घटना नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्याने थोडक्यात दुर्घटना टळली आहे. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं आहे.

या प्रकरणातील आरोपी हा मनोरुग्ण आहे . १८ वर्षीय विद्यार्थिनी मेडिकल चौकातील एटलांटा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणी वर्गात दाखल होताच मनोरुग्णाने मागून येऊन तिच्या डोक्यावर घाव घातला. सुदैवाने ती इन्स्टिट्यूटच्या पायऱ्या चढत असल्याने घाव जोरात लागला नाही. त्यामुळे तिला फार गंभीर ईजा झाली नाही. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून इन्स्टिट्यूटसह शेजारचे लोक तिच्या मदतीसाठी धावले त्यामुळेच आरोपी दुसरा वार करू शकला नाही. नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या प्रकरणातील आरोपी मनोरुग्ण हा त्याच कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी होता. त्यामुळे त्याला इन्स्टिट्यूटचा पत्ता लक्षात राहिल्याने तो तिथे दाखल झाला होता. मात्र, त्याने मुलीवर हातोडीने हल्ला का केला या बाबत खुलासा होऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला उपचारासाठी आई वडिलांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सारीन दुर्गे यांनी दिली आहे. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.