Sat. Oct 1st, 2022

खरी लढत रंगणार भाजप विरूद्ध कॉग्रेस

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे. त्यामुळे भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात खरी लढत होणार आहे.

विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान पार पडले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपा विधानपरिषदेच्या चार जागांवर सहज विजय मिळवू शकतो. तर पाचव्या जागेसाठी भाजपाला १२ मते कमी पडत आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे १५२ संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. तर अपक्ष आणि छोट्या पक्षांनी मतदान केल्यास काँग्रेसचंही दोन्ही उमेदवार जिंकू शकतात.

भाजपचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचे चार उमेदवार सहज जिंकू शकतात. मात्र, संख्याबळ नसताना भाजप पाचवी जागा कशी जिंकणार? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांच्यासाठी भाजपला अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे दहावी जागा विजयी होण्यासाठी प्रसाद लाड यांची धाकधूक वाढली आहे.

छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून २९ आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मात्र असं होणार नाही. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत. भाजप पुन्हा तांत्रिक डावपेच खेळून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार का, याचं उत्तर आज मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.