Sun. Aug 25th, 2019

नागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान

नागपूर पोलिसांवर आता चक्क डुकरांना पकडण्याचीही जबाबदारी आली आहे. शहरातील मोकाट डुकरांना पकडण्यासाठी महापालिकेने विशेष पथकातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त मागितला आहे.

0Shares

नागपूर पोलिसांवर आता चक्क डुकरांना पकडण्याचीही जबाबदारी आली आहे. शहरातील मोकाट डुकरांना पकडण्यासाठी महापालिकेने विशेष पथकातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त मागितला आहे. जमा करण्यात आलेली डुकरे काटोल मार्गावरील चक्क पोलिस मुख्यालयात ठेवण्याची विनंती करणारे अजब पत्र पोलिस विभागाला दिले आहे. त्यामुळे आता पोलिसांवर डुकरांच्याही संरक्षणाची जबाबदारी येणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर पालिका आयुक्तांचा अजब फर्मान

22  जुलै ते 7  ऑगस्ट या दरम्यान तामिळनाडूतील पथकाच्या मदतीने डुक्कर पकडण्याची मोहिम माहापालिकेअंतर्गत राबविण्यात येणार आहे.

डुक्कर पकडल्यानंतर ही वाहने चक्क पोलिस मुख्यालयाच्या मैदानात ठेवण्यात यावी अशी मागणी महापालिकेने केली आहे.

महापालिका शहरातील 15  पोलिस स्टेशनअंतर्गत तामिळनाडूतील पथकाच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

सकाळी 6 ते 11 व दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत ही डुक्कर पकडण्याची मोहीम राबविणार आहे.

मोहीमेत पकडण्यात आलेल्या डुकरांना शहराबाहेर सोडण्यात येणार आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे आता पोलिसांवर डुकरांच्याही संरक्षणाची जबाबदारी येणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *