Wed. Oct 5th, 2022

नियमांना ओवर रूल करण्याची माझी सवयच – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, पूणे

पुण्यात झिपऱ्या या चित्रपटाच्या खास कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री असतानाची एक आठवण शेअर केली. सिंहासन या सिनेमाचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. 

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या गाजलेल्या झिपऱ्या कादंबरीवर आधारित अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत झिपऱ्या या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी प्रतिभा पवार,राज्यसभा खासदार कुमार केतकर,जब्बार पटेल आणि मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार मुख्यमंत्री असताना सिंहासन हा चित्रपट काढण्याचे ठरले, या सिनेमाचे शूटिंग मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी करण्याचे जब्बार पटेल आणि अरूण साधू यांनी ठरवले होते. तशी विनंती आणि परवानगी काढण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे गेलेही होते मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावर

नियमांना बगल देण्याची माझी सवयच आहे असे वक्तव्य शरद पवारांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.