Thu. Sep 29th, 2022

शाळेला लीना नायर यांचे कौतुक नाही

फॅशन क्षेत्रात जगप्रसिद्ध असलेल्या शनैल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) कोल्हापूरच्या मूळ रहिवासी लीना नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शनैल कंपनीच्या सीईओ लीना नायर यांनी ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण पूर्ण केले त्या शाळेला मात्र नायर यांच्या यशाचे कौतुक नाही.

लीना नायर यांच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तसेच शाळेतील काही शिक्षकांनाही त्यांनी कोणाशीही न बोलण्याचा दम दिला आहे.

लीना नायर याआधी युनिलिव्हर कंपनीच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची शनैल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. युनिलिव्हर कंपनीचे सीईओ ऍलन जोप यांनी सांगितले की, ‘गेल्या तीस वर्षापासून लीना नायर या आमच्या कंपनीत कार्यरत होत्या. तसेच त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्यादेखील सांभाळल्या आहेत. त्यामुळे लीना नायर यांच्या कामगिरीचे आम्हाला कौतुक आहे.’ असे ते म्हणाले.

लीनी नायर यांची शैनल कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यामुळे सर्वांनाचे त्यांचे कौतुक आहे. मात्र नायर यांच्या प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.