Wed. Jun 16th, 2021

अमेरिकेत लहान मुलांची शाळा भरणार ‘या’ वेळी

त्यानुसार शाळा आता 7 किंवा 7.30  वाजता न भरता नविन वेळेवर भरणार म्हणजेच 8.30 ला भरणार आहे.

झोप ही आरोग्यासाठी महत्तवाची असताना लहान मुलांना सकाळी शाळेत पाठवण्यासाठी पालकांची धावपळ सुरू असते. मात्र लहान मुलांना सकाळी लवकर उठण्यापासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेतील कॉलिफोर्निया राज्याचे राज्यपाल गॅविन न्युजम यांनी शाळेंच्या वेळेत बदल केले आहेत. लहान मुलांच्या आरोग्याला झोप महत्तवाची असल्यामुळे वेळेत बदल केल्याचे समजते आहे.

अमेरिकेत शाळांच्या वेळेत बदल –

लवकर उठण्याच्या त्रासापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी अमेरिकेतील कॉलिफोर्नियाचे राज्याचे राज्यपाल गॅविन न्युजम यांनी शाळांच्या वेळेत महत्त्वाचे बदल केले आहे.

लहान मुलांच्या शरीरासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे.

लहान मुलांच्या शाळा नेहमीच सकाळच्या वेळेत असतात.

त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा विचार करत अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील शाळांच्या नियमात बदल केले आहेत.

त्यानुसार शाळा आता 7 किंवा 7.30  वाजता न भरता नविन वेळेवर भरणार म्हणजेच 8.30 ला भरणार आहे.

मात्र ज्या विद्यार्थ्यांना लवकरच यायचे आहे ते लवकर देखील येऊ शकणार आहेत.

हे नविन नियोजन व अमंलबजावणी करण्यास कायद्याने शाळांना तीन वर्षांची मुदत दिली आहे.

हा नविन नियम सर्व राज्यातील शाळांमध्ये 1 जुलै 2022 पर्यंत लागू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *