Sat. Apr 20th, 2019

दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार

16Shares

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यामुळे सायंकाळी प्रचाराची रणधुमाळी संपणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात दहा जागांसहित इतर १३ राज्यांतील ९७ जांगावर मतदान पार पडणार आहे.यामुळे भाजपा काँग्रेससहित या मतदार संघातील सर्वच राजकिय पक्षाने शेवटच्या दिवशी कंबर कसली आहे.रॅली,सभांच्या माध्यामातून उमेदवार मतदारांवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेरच्या दिवशी विदर्भात अमरावती येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

महाराष्ट्रात  ‘ या ‘ मतदासंघात मतदान

विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि अमरावतीमध्ये दुसरा टप्प्यात मतदान होणार आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर याचा समावेश आहे.

नांदेड मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरुद्ध भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लढत होत आहे.

अमरावती मतदारसंघात महायुतीचे आनंदराव अडसूळ विरुद्ध महाआघाडी समर्थित नवनीत राणा यांच्यात लढत आहे.

उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर ,राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांच्यात लढत होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 97 जांगावर मतदान

तामिळनाडू – 39
महाराष्ट्र – 10
कर्नाटक – 14
उत्तर प्रदेश – 8
बिहार – 5
आसाम – 5
ओडिशा – 5
छत्तीसगड – 3
पश्चिम बंगाल – 3
जम्मू-काश्मीर – 2
पुदुच्चेरी – 1
मणिपूर – 1
त्रिपुरा – 1

दुसऱ्या टप्प्यात या 13 राज्यातील 97 जांगावर मतदान 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *