Wed. Jun 19th, 2019

घृणास्पद! जन्मदात्या आईवरच मुलाने केला बलात्कार!

0Shares

सातारा जिल्ह्यामध्ये एक मुलाने आपल्या जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील वाई तालुक्यातील एका गावात ही लांच्छनास्पद घटना घडली. या मुलाला त्याबद्दल जबाब विचारणाऱ्या वडिलांनाही मुलाने दगडाने मारहाण केली. या विकृत मुलाविरोधात भुईंज पेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संदीप सूर्यवंशी असं या नराधमाचं नाव आहे.

काय घडलं होतं ?

या नराधम मुलाचे आई वडील एका लग्नासाठी गावाला गेले होते.

तेथून परत येताना आई एकटीच आधी घरी आली.

यावेळी नराधम लेक घराच्या ओट्यावर बसला होता.

आई घराच्या आत गेल्यानंतर तिच्यामागे तोही घरात गेला आणि त्याने दरवाजा बंद करून टाकला.

त्यानंतर या विकृत मुलाने आपल्या जन्मदात्रीवर जबरदस्ती करत बलात्कार केला.

आईचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी मुलाच्या वडिलांना बोलावलं.

या विकृत वागण्याचा जबाब वडिलांनी मुलाला विचारल्यावर त्याने वडिलांनाही दगडाने मारत जखमी केलं.

अखेर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

का फासला त्याने नात्यांना काळीमा?

संदीपचं वय 27 वर्षं आहे.

संदीप दारूच्या अतिआहारी गेला होता.

दारू पिऊन तो वारंवार आई वडिलांना मारहाण करत असे.

त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे त्याचं लग्न जमत नव्हतं.

याच गोष्टीचा त्याला राग येत होता.

आपलं लग्न जमत नसल्याच्या संतापातून त्याच्या विकृतपणाचा कडेलोट झाला आणि त्याने आपल्या जन्मदात्या आईवर बलात्कार करण्याचं महापातक केलं. या वासनांध मुलाला आता पोलिसांनी अटक केलंय.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: