ज्ञानवापीवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला. १४, १५ आणि १६ मे रोजी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले असून या तीन दिवसांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र, ज्ञानवापी मशिदीवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांची तब्येत खराब असल्यामुळे याप्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली होती. हिंदू पक्षाने सुनावणीसाठी शुक्रवारपर्यंतची वेळ मागितली. तर दुसरीकडे याप्रकरणी तात्काळ सुनावणी करण्याची मागणी मुस्लिम पक्षाने केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाची मुदत दिली असून, ज्ञानवापी मशिदीवरील सुनावणी शुक्रवारी दुपारी ३ वाजता होणार आहे.
ज्ञानवापी मशिद सर्वेक्षणाबाबतच्या वाराणसी न्यायालयाच्या कामकाजाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणार आहे. वाराणसी न्यायालयातील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तेव्हा तेथे सुनावणी सुरू होती. त्यावेळी वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी मशिदीशी संबंधित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी दुपारी ३ वाजता यावर सुनावणी होणार आहे.
हिंदू पक्षाचे ज्येष्ठ वकील हरीशंकर जैन यांची तब्येत बिघडल्यामुळे ज्ञानवापी मशिदीवरील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी हिंदू पक्षाने केली. तसेच, याप्रकरणी तात्काळ सुनावणी करण्याची मागणी मुस्लिम पक्षाने केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उद्या २० मे रोजी सुनावणी होण्याचे सांगितले आहे. उद्या दुपारी ३ वाजता सर्वोच्च न्यायालयात ज्ञानवापी मशिदीवर सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.