राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पूर्ण

मनसेचे अध्यक्ष राज ठाकर यांच्यावर लीलवती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. १ जून रोजी राज यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. अखेर राज यांच्या हिप बोनवरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.
राज ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे राज यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. राज यांच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया १ जून रोजी होणार होती. मात्र, कोविड डेड सेलमुळे ऍनेस्तेशीया देता येत नसल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आज अखेर लीलावती रुग्णालयात राज यांच्या हिपबोनवरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.
राज ठाकरे यांच्या हिपबोनवरील शस्त्रक्रिया निर्विघ्न पार पडण्यासाठी मनसेतर्फे रुद्राभिषेक घालण्यात आला. वाशी येथील शिव मंदिरात रुद्राभिषेक घालण्यात आला. तसेच रुद्राभिषेकनंतर हनुमान चालीसा पटनदेखील करण्यात आले.