Sat. Jul 31st, 2021

अतिउत्साही पर्यटकांची हुल्लडबाजी, टेम्पो ट्रॅव्हलर समुद्रात घुसला

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर अनुचित प्रकार घडला आहे. समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगाने रेसिंग करताना टेम्पो ट्रॅव्हलर समुद्रात घुसल्याची घटना घडली आहे.

27 डिसेंबरची ही घटना आहे. दरम्यान स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे बाकी प्रसंग टळला.

टेम्पो ट्रॅव्हलरला ट्रॅकटरच्या साहय्याने बाहेर काढण्यात आले.

पण यासर्व प्रकारामुळे स्थानिकांना तसेच पर्यटकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आडे समुद्रकिनारी ही घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर गाडी समुद्रात वाहून गेली. स

्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे गाडीतील पर्यटकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.

या सर्व प्रकारामुळे आता समुद्रकिनाऱ्यावर वाहन घेऊन जाण्याला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरीही अतिउत्साही पर्यटक वाहन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर सफर करत आहेत.

या अशा प्रकारामुळे अनेक वेळा समुद्रकिनाऱ्यावर गाड्या वाळूत रुततात. याआधी मुरुड, हरणे समुद्रकिनार्‍यावर अनेक गाड्यांना जलसमाधी सुद्धा मिळाली आहे.

मुरुड समुद्र किनाऱ्यावर काही पर्यटकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *