Sun. Sep 19th, 2021

कोरोना संदर्भात अफवा पसरवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर पसरले आहे. भारतातही याचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेले अनेक रूग्ण देशात आढळत आहेत.

या पार्श्वभूमीवर अनेक अफवा तसेच खोट्या बातम्या समाजात लोक पसरवत आहेत. यासाठी सरकारने अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अशाच एका सोलापूरमधील तीन व्यक्तींवर अफवा पसरवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात बनावट ऑडिओ क्लिप बनवून सोशल मीडियावर व्हायरल केली.

यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जिल्ह्यातील तिसरा गुन्हा आहे.

पवन जाधव, भैरू मोरे आणि वसंत जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बार्शी पोलीस गणेश दळवी यांनी फिर्याद दाखल केली होती.

या तिघांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *