Jaimaharashtra news

राफेलप्रकरणी पीएमओचा गैरवापर; पंतप्रधानांवर खटला भरण्याची वेळ – राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर करण्यात आला असून राफेल डीलप्रकरणी झालेला घोटाळा उघड झाला आहे.

त्यामुळे पंतप्रधान मोदींवर आता फौजदारी खटला दाखल करण्याची वेळ आली आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राफेल डीलप्रकरणी विमाने बनवणारी फ्रान्सची कंपनी डसाँ एव्हिएशनला फायदा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर झाला असून याद्वारे सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

यामुळे पंतप्रधानांवर आता फौजदारी खटला दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले आहेत.

त्यामुळे नरेंद्र मोदींपासून सुरु झालेल्या या भ्रष्टाचाराच्या खेळाचा शेवट त्यांच्यावरील कारवाईनेच होणार आहे, असं ट्वीट राहुल गांधींकडून करण्यात आले आहे.

राफेलप्रकरणाची काही कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरी गेली असल्याचे केंद्र सरकाने सुप्रीम कोर्टात सांगितले आहे.

यावरुन सरकार चोरांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असून जे खरं बोलत आहेत त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम करीत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे.

पुरावे नष्ट करण्याचा आणि सरकारच्या गंभीर चुकांवर पांघरुन घालण्याचा हा प्रकार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version