Tue. Sep 28th, 2021

लिफ्ट देतो सांगून महिलेला टेम्पोत घेतले अन्…

बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. नुकतीच पिंपरीतील बलात्काराची घटना समोर आली आहे.

आयशर टेम्पोमध्ये 29 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. टेम्पो चालक आणि क्लिनरने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पेरणे फाटा येथे सोडतो असं सांगून या नराधमांनी दहा फेब्रुवारीच्या रात्री 11 वाजता त्या महिलेला सोबत घेतले. त्यानंतर तिला पिंपरी चिंचवड शहरात रात्रभर फिरवले. पहाटे चार वाजता एक्सप्रेस वेवर त्या नराधमांनी तिला सोडले.

तिथून ही महिला शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि घडल्या प्रकारचा गुन्हा तिने दाखल केला. तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

एकाने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर शिरगाव पोलीस स्टेशनने हा गुन्हा आळंदी पोलीस स्टेशनकडे वर्ग केला आहे. याचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *