Thu. Sep 29th, 2022

भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलला

आज ५ जानेवारी ‘आर्मी डे परेड’च्या दिवसाचे औचित्य साधून भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलण्यात आला आहे. मेक इन इंडियानुसार, सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी १३ लाख भारतीय सैन्यासाठी केली आहे. आतापर्यंत तीन वेळा सैन्याचा गणवेश बदलण्यात आला आहे.

भारतीय जवानांच्या गणवेशात करण्यात आलेला बदल हा डिजिटल नमुन्यांच्या आधारावर डिझाइन करण्यात आला  आहे. तर विविध प्रदेशांना नजरेस ठेवत जवानांचा हा गणवेश बनविण्यात आला. तसेच सुरक्षेच्या कारणामुळे जवानांचे हा गणवेश बाजारात उपलब्ध असणार नाही. दरम्यान जवानांच्या नवीन गणवेशाच्या कापडामध्ये ७० टक्के कापूस आणि ३० टक्के पॉलिस्टर असणार असून हे कापड वजनाने हलके आणि आरामदायी असणार आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतीय आणि पाकिस्तानी जवानांचा गणवेश वेगवेगळा असावा, यासाठी बदल करण्यात आले होते. त्यानंतर १९८०मध्ये त्यात बदल करण्यातआला असून त्याला बॅटल ड्रेस असे नाव देण्यात आले. तर २००५मध्ये जवानांच्या गणवेशात बदल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.