Thu. Jun 17th, 2021

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी ‘द वीक’चा माफीनामा

‘द वीक’ या नियतकालिकाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत प्रसिद्ध केलेल्या पाच वर्ष जुन्या लेखाबद्दल माफी मागितली आहे. ‘मल्याळम मनोरमा’ या प्रकाशन संस्थेच्या ‘द वीक’ नामक इंग्रजी नियतकालिकाच्या मे महिन्यातल्या ताज्या आवृत्तीत हा माफीनामा प्रसिद्ध झाला आहे. (चित्र पहा.) सावरकर बदनामी विरोधातला खटला ५ वर्षे सुरू होता. त्या दरम्यान न्यायालयीन लढाईत २१ वेळा सुनावणी झाली. अखेरीस संबंधित लेखक आणि तत्कालीन संपादक संस्थेतून बाहेर गेले व ‘मल्याळम मनोरमा’ या प्रकाशन संस्थेच्या व्यवस्थापनाने माफी मागण्याचा मार्ग निवडला.

‘द वीक’ या नियतकालिकाने २४ जानेवारी २०१६ मध्ये ‘ए लँब, लायनाईज्ड’ शीर्षक लिहून प्रसिद्ध केलेला लेख वादग्रस्त ठरला.
अंदमानच्या तुरुंगात मरणप्राय वेदना सहन करत असतानासुद्धा भारत भूमीच्या स्वातंत्र्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेऊन परिस्थितीशी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जनमानसात असलेली श्रद्धेय भावना मोडण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सदर वादग्रस्त लेखात झाल्याचे तक्रारदाराचे प्रथमदर्शनी म्हणणे होते. हा लेख निरंजन टकलेने लिहिला होता. त्याने लेखाद्वारे सावरकरांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले गेले. जे वाचकांसह सावरकरप्रेमींच्या पसंतीस उतरले नाहीत. त्यामुळेच, न्यायालयात या लेखाच्या विरोधात दाद मागितली गेली. लेखातल्या तपशिलाच्या पुष्ट्यर्थ टकलेने कथित इतिहासकार शमशुल इस्लामचा संदर्भ दिला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे गांधी हत्येत सामील असल्याचेही या लेखामध्ये लिहिले होते.

 

हे सगळे लेखन ‘द वीक’च्या प्रकाशन संस्थेने समूळ नाकारले आहे. तसे त्यांच्या माफीनाम्यातून स्पष्टपणे समोरही येत आहे. पाच वर्ष जुन्या लेखाबद्दल माफी मागताना ‘मल्याळम मनोरमा’चे व्यवस्थापन म्हणते की, ‘सदर लेखामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अत्युच्च व्यक्तिमत्वाबद्दल अपसमज निर्माण होऊ शकतो.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत व्यवस्थापनाला सर्वोच्च आदर असून सदर लेख प्रसिद्ध केल्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबाबत व्यवस्थापन खेद व्यक्त करत संबंधितांची माफी मागत आहे.’

व्यवस्थापनाने माफी मगितल्याचे समजताच टकलेने वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माफीनामा धक्कादायक’ असल्याचे टकलेने काही निकटवर्तीयांना सांगितल्याचे कळतेय आणि तो स्वतः माफी न मागण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही म्हणतोय असे त्याचे निकटवर्तीय सांगतायत.

दरम्यान, या लेखाचा संदर्भ घेत देशात काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामीची मोहीम अधिक वेगाने सुरू झाली. त्या मोहिमेला आता जोरदार धक्का बसल्याची भावना सर्व सावरकरप्रेमी व्यक्त करत आहेत. ‘काँग्रेसचा सावरकर द्वेष आता तरी नष्ट होईल आणि तसे झाले नाही तर काँग्रेसचा सावरकर द्वेष हा हेतूत: आहे हे अधोरेखित होतेय.’ अशी प्रतिक्रिया रणजित सावरकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीकडे व्यक्त केलीय.

‘द वीक कडून संपर्क साधून सवरकरप्रेमींची माफी मागितली गेली. सावरकरांप्रती व्यवस्थापनाला आदर आहे, असं संबंधितांनी म्हटल्यावर तसं स्पष्टपणे छपावे हा आग्रह धरला असता तो मान्य करून संबंधित प्रकाशनाने, या आठवड्यातील आवृत्तीमध्ये झाल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली आहे. तसेच, सावरकरांची चांगली बाजू मांडणारा लेख प्रकाशित करणार असल्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिल्याचेही तक्रारदार रणजित सावरकर यांना म्हटलं आहे.

“अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं तेव्हा काही भाडोत्री लेखकांना हाताशी धरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्याचा पहिला प्रयत्न केला गेला. वाजपेयीचं सरकार पडल्यानंतर इतकी वर्ष कोणाला सावरकर आठवले नाहीत. पण, २०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हा, काँग्रेसला भीती वाटू लागली की, आता आपले काही खरे नाही. सावरकरांचे अनुयायी सत्तेत आले तर, आपल्या गांधीवादी विचारांना कुणीही विचारणार नाही. त्यांना औरंगजेब आणि अकबराला मानणारा हिंदूच पाहिजे. त्यामुळेच, काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी पुरस्कृत केली जातेय” अशी टीका देखील यानिमित्ताने बोलताना रणजित सावरकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *