Mon. Jul 4th, 2022

‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव लवकरच रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे.  त्यांचा ‘द व्हाईट टायगर’या हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचा काही फोटो प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आदर्श गौरव त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या मन जिंकली आहे तर राजकुमार आणि प्रियंकाने त्यांच्या जबरदस्त अंदाजाने प्रेक्षकांना मोहून टाकलं आहे.

या चित्रपटात प्रियंकाने यात पिंकी नावच्या मुलीची भूमिकेत आहे तर राजकुमार राव हा अशोक नावाचं पात्र साकरात आहे आणि आदर्श गौरव बलराम नामक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात ड्रायव्हर बलरामला श्रीमंत व्हायचे असते. तो यासाठी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मात्र एका वळणावर लवकरात लवकर पैसा कमवण्याच्या नादात तो चुकीच्या मार्गाने जायला लागतो. या चित्रपटाची संपूर्ण कथा वेगळ्या वळणावर जाते.

हा चित्रपट अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे तर अरविंद अडिगा यांना त्यांच्या या पहिल्याच कादंबरीसाठी बुकर पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शिन हे रमिन बहरानी करत आहेत तर  ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात प्रियंका एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर तर नेटफ्लिक्सोबत मुकूल देवरा मिळून हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे.

हा चित्रपट नेटफ्लिक्ससोबतच चित्रपटगृहांमध्येही रिलीज होणार आहे. या चित्रपटातआदर्श गौरव मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना किती भावणार यासाठी आणखी थोडी वाट बघावी लागेल. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.