Mon. Jan 17th, 2022

ठाणे महापालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर

ठाणे महापालिकेच्या घोडबंदर रोड परिसरातील आनंदनगर आरोग्य केंद्रामध्ये २५ जून रोजी हा प्रकार घडला आहे.ठाण्यातील एका २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी लशीच्या तीन मात्रा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान महिलेची प्रकृती स्थिर असून पालिका डॉक्टरांच्या निग्राणीखाली ठेवण्यात आले आहे.तसच लसीचे तीन डोस देण्यात आले असताना देखील पालिका प्रशासन तोंडावर बोट ठेवत आहे, मात्र या प्रकारामुळे पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर आरोग्य केंद्रामध्ये ब्रह्मांड येथे राहणाऱ्या रूपाली साळी या आनंदनगर लसीकरण केंद्रामध्ये लशीची पहिली मात्रा घेण्यासाठी गेल्या होत्या. पहिली लसमात्रा घेतल्यानंतर त्यांना काही मिनिटांनी आणखी दोन वेळा लस टोचण्यात आली. लसीकरण केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट त्यांच्या पतीला सांगितली.परंतु, प्रकृती बरी असल्याने त्या दिवशी त्यांनी कोणाला काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी ही गोष्ट स्थानिक नगरसेविका कविता पाटील यांच्या कानावर घातली . या घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणांनी या महिलेची पाहणी करून तिच्या प्रकृतीची तपासणी केली. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तीनदा लसीकरण झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.निष्काळजीमुळे हा प्रकार घडला असून, याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचदरम्यान आरोग्य केंद्राकवरच्या निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *