Wed. Dec 8th, 2021

कोरोनाच्या भीतीने तरुणाचे बिघडले मानसिक संतुलन

संपुर्ण जगात सध्या कोरोना व्हायरसची एवढी दहशत झाली आहे की, नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात कोरोना व्हायरसची एका 21 वर्षीय तरुणाला चांगलीच धास्ती बसली आहे.

त्याचं मानसिक संतुलन कोरोनामुळे बिघडलं आहे. कोरोना व्हायरस विषयी सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि मॅसेजस पाहुन या तरुणाला आपल्याला कोरोना व्हायरस आजार झाला आहे अशी भिती वाटत आहे.

त्यामुळे या तरुणाला नांदेडच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रामेश्वर बोले यांच्याकडे पाठवण्यात आले. युट्युब, फेसबुक, व्हॉटसअपवर कोरोना विषयीचे व्हिडीओ, मॅसेज पाहिले आणि ही बाब या तरुणाच्या मनात बसली आणि त्यालाही कोरोना आजार झाला असा भास होऊ लागला.

तरुणाच्या अशा वर्तनाने पत्नी आणि बहिणीने त्याला पहिले जनरल फिजिशियन कडे दाखविले. मात्र, याचा काही फरक पडला नसल्याने नांदेडच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. बोले यांच्याकडे आणले.

त्या तरुणावर उपचार करण्यात आले असून, प्रकृती सुधारली आहे. तपासणीत या तरुणाला इनलेक्स अँन्सायटी डिसॉर्डर आजार झाला असल्याचे निदर्शनास आले.

म्हणजेच एखाद्या गोष्टीची भिती वाटली की त्याचाच भास होतो. हा आजार उपचाराने बरा होतो. मनाने भित्रे आणि हळव्या लोकांना हा आजार होतो अशी माहिती डॉ. बोले यांनी दिली आहे.

त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील त्यांनी केल आहे. अशी भिती वाटणाऱ्यांचे समुपदेशन केलं पाहिजे असे त्यांना यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *