Mon. Aug 15th, 2022

‘भोंगे उतरवायचे न्यायालयाचे आदेश नाहीत’ – दिलीप वळसे-पाटील

ठाण्यात मनसेच्या पार परडेल्या उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मविआवर निशाणा साधला. तर ईदीपूर्वी मशिदीवरील भोंग उतरवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. यावर, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टोक्ती केली आहे. मशिदीवरील भोंगे उतरवायचे न्यायालयाचे आदेश नसल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

राज ठाकरेंनी ठाण्यात पार पडलेल्या उत्तरसभेत ईदीपूर्वी मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सांगितले. अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, भोंगे न उतरवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून स्पष्टोक्ती झाल्यानंतर आता भोंग्याच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे.

सभेत काय म्हणाले राज ठाकरे?

मशिदीवरील भोंग्यांचा देशाला त्रास होत आहे. भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो. त्यामुळे ते भोंगे उतरवले पाहिजे. आणि जर सांगून समजत नसेल तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. तसेच भोंग्याच्या भूमिकेबाबत आता आम्ही माघार घेणार नाही, असेही राज ठाकरेंनी सांगितले. ईदनिमित्त राज ठाकरे यांनी मविआला सूचना दिल्या आहेत. मशिदीवरील भोंगे ईदपूर्वी खाली उतरवा. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाहीत. भोंगे खाली उतरवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणारच, असे राज ठाकरे म्हणाले.

मशिदींवर लावलेले भोंगे (अझान) म्हणजे काय?

अझान म्हणजे नमाज पठण करण्यासाठी नमाजच्या वेळेची आठवण करून देणे होय. अझान हा शब्द रबी भाषेतल्या अझिन या शब्दावरून घेण्यात आला. दिवसातून ५ वेळा हा अझान दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.