कोरोनाच्या तपासणीसाठी रक्त चाचणी होत नाही – आरोग्यमंत्री

राज्यात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४२ वर जाऊन पोहचला आहे. यााबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. कोरोना आहे की नाही, हे तपासणीसाठी रक्त चाचणी केली जाते.
तसेच या रक्त चाचणीसाठीची महाराष्ट्रातील रुग्णालयांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही माहिती फेक असून या चूकीच्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
या संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे.
कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी राज्यात लवकरच ४-५ प्रयोगशाळा वाढवणार असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
संशयित रुग्णाला कोरोनाची लागण आहे की नाही, हे समजण्यासाठी त्या संबंधित रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो.
तसेच राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात.
राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( ‘नसो फैरिंजीयल स्वाब’ Nasopharyngeal swabs) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. राज्यात मुंबई,पुणे व नागपुर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही ४२ झाली आहे. या ४२ पैकी १ रुग्णाचा मंगळवारी मुंबईत मृत्यू झाला आहे.
त्यामुळे भारतातील मृतांचा संख्या ही ३ वर पोहचली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पब, बार, मॉल आणि जिम, धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचं आदेश दिले आहे.
तसेच राज्यातील आगामी सर्व निवडणुका अनिश्चतित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिली आहे.