Wed. Jun 29th, 2022

राज्यात भारनियमन नाही, मात्र कोळसा टंचाईचं संकट

राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमाचे संकट ओढवले आहे. राज्यातील भारनियमनाच्या संकटामुळे विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. मात्र, अशातच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यात कुठेही भारतनियमन नाही, मात्र राज्यावर कोळसा टंचाईचे संकट असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

राज्यात सुरू असलेल्या ऊर्जा टंचाईबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील ऊर्जा टंचाईबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यात कुठेही भारनियमन नाही मात्र, कोळसा टंचाईचे संकट असल्याचे सांगितले आहे. नितीन राऊत म्हणाले, देशात कोळसा टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोळशाची टंचाई आहे पण कुठेही भारनियमन नाही. तसेच आता विजेची तूट १५ टक्क्यांच्या आसपास आहे, ही गंभीर बाब असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. तर महाराष्ट्रासह इतर राज्यातही कोळसा टंचाई उद्भवली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच महाजनको ८ हजार मेगावॅट वीज निर्माण करून राज्याला देणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, आम्ही साडेसात हजार मेगावॅट वीज निर्मितीची तयारी ठेवली होती. मात्र, त्यात मुख्यमंत्र्यांनी ५०० मॅगावॅट वीज निर्मिती जादा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे महाजनको ८ हजार मेगावॅट वीज निर्माण करून राज्याला देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.