Fri. Sep 30th, 2022

‘मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही’

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्यापासूनच एकाही महिलेचे नाव चर्चेत नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारकडून अचानक धक्का दिला जाईल, अशी शक्यता होती. पण एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने हे फक्त पुरुष प्रधान सरकार असल्याची टीका होतेय. याच आशयाची टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस टीकास्त्र सोडलं  आहे.

“स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे”. अशा आशयाचं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. छोटेखानी मंत्रिमंडळात विस्तारात अपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. तसेच या मंत्रिमंडळ विस्तातरीत महत्त्वाची मोठी बाब म्हणजे यात एकही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहाटे साडेपाच वाजेपर्यंत बैठक चालली. या बैठकीनंतर दोन्ही बाजूंकडून मंत्रीपदासाठी आमदारांची नावं निश्चित केली गेली. यानंतर सकाळी ११ वाजता राजभवनात १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण यात विस्तारात एकाही महिलेला स्थान देण्या आलेले नाही. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.