देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांचे भाषण नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवरी संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केले. तर विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते यांचे भाषण झालं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
देहूतील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. त्यानंतर अजित पवार यांचे भाषण होणार होते. मात्र, कार्यक्रमात त्यांचे भाषण झाले नाही. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून अजित पवार देहूतील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमात त्यांचं भाषण होणार हे अपेक्षित होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस याचं भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाच्या निवेदकाने पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतले. यावेळी पंतप्रधानांनी अजित पवारांचं भाषण राहिल्याचं निवेदकाच्या लक्षात आणलं. मात्र त्यानंतर पंतप्रधान भाषणासाठी उभे राहिले.
दरम्यान, देहूतील या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण न केल्यामुळे आता राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, अद्याप यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.