Tue. May 17th, 2022

नाना पटोलेही भाजप विरोधात आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नाना पटोले आणि भाजपमध्ये नव्या वादाला जागा निर्माण झाली आहे. पटोलेंच्या गावगुंड मोदी या वक्तव्यामुळे भाजपने नाना पटोलेंवर टीका केली आहे. दरम्यान, नाना पटोलेही भाजप विरोधात आक्रमक  झाले आहेत. ‘देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत’, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

भाजपची काय अवस्था झाली आहे. लोक हे पाहून हसत आहेत. ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जेवढे पुतळे पटेवायचे तेवढे पेटवा, तुम्हाला जनताच पेटवेल, अशी टीकासुद्धा पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, गावगुंडानेच सांगितले की माझी बायको पळाली म्हणून माझे नाव मोदी. त्यामुळे देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत. मात्र, भाजप ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जोडून त्यांना बदनाम करत आहेत. त्यामुळे पुतळे पेटवायचे तेवढे पेटवा, तुम्हाला जनताच पेटवेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

2 thoughts on “नाना पटोलेही भाजप विरोधात आक्रमक

  1. I think this is one of the most important info for me. And im glad reading your article. But should remark on few general things, The website style is great, the articles is really excellent : D. Good job, cheers

  2. I need to start up a website but i don’t want to use a free web host. I will be using the website for a webcomic but i’m not sure how to go about it. Can someone help me?.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.