Mon. Aug 15th, 2022

सहाव्या उमेदवाराबाबत सामूहिक निर्णय होईल – नाना पटोले

राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेना नेते तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराबाबत काँग्रेसने शिवसेनेला टोला लगावला आहे. राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराबाबत मविआत चर्चा करून सामूहिक निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

शिवसेनेने परस्पर राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत शिवसेनेला टोला लगावला आहे. राज्यसभेच्या सहाव्या उमदेवाराबाबत सामूहिक निर्णय होईल, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

राज्यसभेच्या उमेदवारासाठी भाजपचे दोन उमेदवार, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार असे पाच उमेदवार निवडले जाऊ शकतात. अशातच शिवसेनेने सहाव्या उमेदवाराची घोषणा केली. म्हणजेच राज्यसभेसाठी शिवसेनेचे दोन उमेदवार असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने परस्पर सहाव्या उमेदवाराची घोषणा केली असून सहाव्या उमेदवाराबाबत सामूहिक निर्णय होणार असल्याचे, नाना पटोले यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यसभेवर निवडून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मदत करण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले होतं. तसेच त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र, शिवसेनेने सहाव्या उमेदवाराची घोषणा केल्यामुळे संभाजीराजे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेसला संभाजीराजेंची हरकत नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेसची संभाजीराजे यांना पक्षात घेण्याची सकारात्मक भूमिका स्पष्ट होत आहे.

1 thought on “सहाव्या उमेदवाराबाबत सामूहिक निर्णय होईल – नाना पटोले

  1. I was wondering if you ever considered changing the layout of your site? Its very well written; I love what youve got to say. But maybe you could a little more in the way of content so people could connect with it better. Youve got an awful lot of text for only having one or two pictures. Maybe you could space it out better?

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.